Thursday, June 20 2019 2:39 pm

धारावी खरंच निवासास सुरक्षित आहे का?


बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्याने कंत्राटदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह

मुंबई :- धारावीतल्या पीएमजीपी कॉलनीमधील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी आहेत. रविवारी रात्री 10.30 वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. कंत्राटदराच्या हलगर्जीपणामुळे या इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

याच कॉलनीमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग एका रिक्षाचालकावर कोसळला.या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलवरून जाणारी व्यक्तीही या अपघातात जखमी झाली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरू आहे.