Tuesday, January 21 2020 8:55 pm

धनगर प्रतिष्ठानतर्फे पूरग्रस्तांच्या मुलांना शैक्षणिक मदत

ठाणे :- अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने सर्वत्र हाहाकार घातल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चहूकडून मदतीचा ओघ सुरू असताना धनगर प्रतिष्ठान,ठाणे यांच्यावतीने देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम न करता कार्यक्रमासाठी होणाऱ्या खर्चातून पूरग्रस्तांच्या मुलांना शैक्षणिक मदत देण्यात आली.यावेळी जीवनावश्यक मदतीऐवजी शैक्षणिक मदत मिळालेली पाहून विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंददेखील गहिवरले.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराने थैमान घातल्यामुळे शेकडो कुटुंबांना घराबाहेर पडावे लागले असल्याने धनगर प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी साजरा करून धनगर समाजातील १० वी  ,१२ वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमदेखील करण्यात येतो.मात्र,यंदा हे सर्व कार्यक्रम रद्द करून कार्यक्रमाला येणाऱ्या खर्चातून सांगली जिल्ह्यातील आमणापूर या पूरग्रस्त गावातील प्रगती विद्यालय,जिल्हा परिषद शाळा,आमणापूर ,जिल्हा परिषद शाळा-विठ्ठलनगर, यामध्ये शिकणाऱ्या १ ते १० विच्या मुलांना शैक्षणिक साहित्य दप्तर,वह्या,पेन,पेन्सिल,रब्बर,शार्पनर संच,वॉटर बॉटल,ब्लँकेट,कपडे देण्यात आले.यावेळी शैक्षणिक साहित्य मिळाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहण्यास मिळाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे.कार्याध्यक्ष महेश गुंड,खजिनदार अविनाश लबडे,उपसचिव तुषार धायगुडे,कार्यकारणी सदस्य सुरेश भांड, दिपक झाडे,मनोज खाटेकर,आमणापूर विठ्ठलवाडी गावातील मान्यवर सुरेश पाटील,श्रीकृष्ण आवटे,प्रगती विद्यालयातील मुख्याध्यापक जीवन कांबळे,मुख्याध्यपिका मोकाशी मॅडम,विश्वनाथ पाटील,राजाराम पाटील,उत्तम पाटील,गोविंद पाटील,अनिल माने,संग्राम पाटील,संदीप पाटील,हेमंत पाटील,मच्छिन्द्र पाटील,सुरेश मतकरी,सोपान पाटील,व राजमाता प्रतिष्ठान,आमणापूर यांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकाळात जनतेच्या हिताची कामे केली.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून धनगर प्रतिष्ठानने पूरग्रस्तांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य मदत दिली.शैक्षणिक साहित्य मिळाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून खऱ्या अर्थाने अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी झाली अशी भावना प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यानी यावेळी व्यक्त केली.पुरग्रस्तांच्या या सर्व मदतीसाठी धनगर समाजातील उद्योजक संदेश कवितके,व्यवसायिक उत्तम यमगर,पोलीस सुधीर शेळके,समाजसेवक शरद भेलसेकर,पी एन व्हनमाने, लॉन टेनिस प्रशिक्षक तुषार धायगुडे,युवा सेना कोपरी पाचपाखडी समनव्यक दीपक झाडे,संतोष दगडे,हेमंत शेवाळे (रोहा),प्रशांत वारे, मंगेश गुंड, हेमंत कुचेकर, नामदेव चांगण,सचिन कापडी,वैभव सामसे,शशिकांत वाघमोडे,डॉ प्रथमेश बुधे,दादा कर्णावर सर,सुधा करमरकर (आजी),सुनील पळसे,शंकर लाळगे,अशोक चांगण,प्रमोद वाघमोडे, हेल्थकेअर ऍट होम उपव्यवस्थापक विवेक श्रीवास्तव, संदीप गुप्ता,आकाश ताटके,नवी मुंबई वाशी मार्केट मित्र मंडळ आदींनी सहकार्य केले.