Saturday, August 24 2019 11:42 pm

धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर ढगाळ वातावरणामुळे भरकटलं, इमर्जन्सी लँडिंग

बीड-: विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर ढगाळ वातावरणामुळे भरकटलं आणि त्यानंतर त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. वाऱ्याचा उलट वेग असल्याने हेलिकॉप्टर भरकटल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

आज कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेसची सरकारच्या विरोधात निघालेली निर्धार परिवर्तन रॅली आहे. पुढच्या काही वेळात कोल्हापुरातील कागल इथं राष्ट्रवादी कीँग्रेसची जाहीर सभा होणार आहे. या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अजित पवार, छगन भुजबळ धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहणार होते.

उद्या म्हणजेच मंगळवारी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रांच्या जाहीर सभा होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे, त्या ठिकाणीच सभा आयोजित केल्याचं चित्र पाहायला मिळतं.