Sunday, September 15 2019 3:15 pm

दोन दिवसात आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे १०५ तक्रारी

ठाणे : ठाणे शहरातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष दोन दिवसात तब्बल १०५ तक्रारींचा नोंद झाली असून 24 तास कार्यरत आहे. १०५ तक्रारींना आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाने तात्काळ प्रतिसाद दिला आहे.

गेल्या दोन दिवसात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असुन नागरिकांनी पाणी तुंबणे, वृक्ष पडणे अशा विविध १०५ तक्रारी आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच अग्नीशमन दलास प्राप्त झाल्या असून या सर्वच तक्रारींना अग्निशमन विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तात्काळ प्रतिसाद दिला आहे.

पावसाळ्यामध्ये आपत्ती निवारणासाठी विशेष काळजी घेण्यात यावी तसेच अग्निशमन विभागाने सतर्क राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा 24 तास कार्यरत असून नागरिकांच्या तक्रारींना यंत्रणेकडून योग्य प्रतिसाद दिला जात आहे.

महानगरपालिका क्षेत्रात पूर परिस्थिती उदभवू नये याकरिता महापालिकेने नालेसफाई व इतर आवश्यक उपाय योजना केल्या असून पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उदभवल्यास नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री क्र-१८०० २२२ १०८ किंवा हेल्पलाईन – २५३७१०१० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने आले आहे