Wednesday, February 26 2020 9:43 am

दोन कोटीची फसवणूक करणाऱ्या दोघांना २ कोटीच्या रक्कमेसह पाच तासात जेरबंद

ठाणे :  बांधकाम कंपनीच्या मालकाला सहा कोटीचे कर्ज मंजूर करून देतो. अशी बतावणी करीत विश्वास संपादन करून कर्जासाठी बँकेत २ कोटीच्या रक्कमेचा भरणा करावा लागेल. ती २ कोटीची रक्कम फिर्यादीकडून बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून रोख रक्कम घेऊन पोबारा करीत फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दोघं विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात १३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर सादर प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने दोघं आरोपीना पाच तासाच्या आत २ कोटीच्या रक्कमेसह अटक केली.
         फिर्यादी अक्षय अनंत परवडी रा. मालाड मुंबई यांनी गुन्हे शाखेला १२ फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हे शाखा युनिट -१ च्या पथकाने तांत्रिकदृष्ट्या तपास केला. तर खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणे रेल्वे स्टेशनमधून दुपारी पावन एक्सप्रेस एसी-१ मध्ये बिहारकडे  प्रवास करीत असलायची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथकाने त्वरित पावन एक्सप्रेस  मधील आरपीएफ आणि जीआरपी यांच्या मदतीने शोध घेतला अखेर दोघे आरोपी हे २ कोटीच्या रक्कमेसह रेल्वे पोलीस पथकाच्या जाळ्यात अडकले. आरोपी जाळ्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी देताच गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक  आणि पथक खांडवा मध्य प्रदेश कडे रवाना झाले. पोलिसांनी विनोदकुमार राजकुमार झा(४८) आणि अमितकुमार चांदी यादव(२६) रा. दरभंगा बिहार राज्य असून ते परराज्यात पलायन कर्णयच्या प्रयत्नात होते. पोलीस पथकाने त्यांच्याकडे फिर्यादीकडून स्वीकारलेली २ कोटीच्या रक्कमेची बॅग हस्तगत केली. अखेर दोघं आरोपीना तत्परतेने गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने पाच तासात बेड्या ठोकून मुद्देमालासह ठाण्यात आणले. ठाणे नगर पोलीस अधिक तपास करीत आहे.