Tuesday, June 2 2020 3:31 am

देश की जनता भुखी है.. अण्णा भाऊंचे वाक्य खरे ठरतेय- आनंद परांजपे

ठाणे :- ये आझादी झुटी है, देश की जनता भुखी है, अशी घोषणा अण्णा भाऊ साठे यांनी दिली होती. स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर आता तशीच परिस्थिती आली आहे, असे प्रतिपपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, पांचपाखाडी, ठाणे येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलेे. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना ते बोलत होते. या प्रसंगी, सरचिटणीस प्रभाकर सावंत, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष रामदास खोसे, ब्लॉक अध्यक्ष रविंद्र पालव, समीर पेंढारे, शहर कार्यकारिणी सदस्य दिलीप नाईक, अजित सावंत, युवक पदाधिकारी संदीप पवार, जावेद शेख, संकेत नारणे आदी उपस्थित होते.

यावेळी आनंद परांजपे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे हे बहुआयामी व्यक्तीमत्व होतेे. भारतात जन्माला आलेल्या आणि केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या  अण्णा भाऊंचा पुतळा रशियाच्या मॉस्कोमध्ये उभा राहिला आहे. हा भारताचा गौरवच आहे. अण्णा भाऊ यांनी आपल्या लेखणीमधून निर्माण केलेले साहित्य हे अनुभवातून आलेले आहे. असे म्हटले जाते की, जे ना देखे रवी; ते देखे कवी! अण्णा भाऊ यांनी अनेक वर्षांपूर्वी “ ये आझादी झुटी है, देश की जनता भुखी है, असे म्हटले होते. त्यांच्या या वाक्याची प्रचिती आता येऊ लागली आहे. या देशामध्ये गॅसचे दर वाढलेले आहेत; अन्नधान्याच्या किमंती वाढल्या आहेत. येथील काही समाज दहशतीखाली जगत आहे. त्यामुळेच अण्णा भाऊंचे वाक्य आजही खरेच ठरत आहेत, असे म्हणणे योग्यच आहे.