ठाणे, 03 विजय शिवतरे प्रकरणी अंत भला तो सब भला. देशामध्ये ४०० पार आणि महाराष्ट्रात अबकी बार ४५ प्लस पार, पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील त्यावेळी सळो की पळो स्थिती झालेली मा. जयंत पाटील यांना दिसेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.
विजय शिवतरे यांची समजूत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवारसाहेब यांनी काढली. यानंतर शिवतरे यांनी बारामतीतुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. सुनेत्राताई अजित पवार यांना संपूर्ण पाठिंबा घोषित केला आणि पुरंदरमधून दीड लाखाचे मताधिक्य देऊ अशाप्रकारचा विश्वास विजय शिवतरे यांनी तीनही नेत्यांना दिला. त्यामुळे विजय शिवतरेजी आता महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार बारामती लोकसभेमध्ये जोरात करतील. मला विश्वास होता की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, आणि महायुतीतील तीनही नेते हे विजय शिवतरे यांना एकत्रितरीत्या घेऊन बसले, त्यांच्याही काही अडचणी होत्या त्या त्यांनी समजून घेतल्या. त्यामुळे अंत भला तो सब भला.राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका होती की . देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठीमहायुतीचे ४५ प्लस खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले पाहिजेत. पण ज्यावेळेला विजय शिवतरे यांनी राष्ट्रवादीच्या स्वाभिमानावर आघात केला त्यावेळी राष्ट्रवादीचा एक जिल्हाध्यक्ष म्हणून, राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून ती माझी एक नैसर्गिक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. आता जसे विजय शिवतरे हे महायुतीचे काम करणार आहेत तसे आम्ही देखील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते महायुतीचे तीनही उमेदवार विजयी होण्यासाठी कामाला लागलेलो आहोत. महाराष्ट्रातील चारपाच जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तीनही नेत्यांमध्ये चर्चा सूरु आहे या जागांवर लवकरात लवकर योग्य तो तोडगा निघेल आणि महायुतीचेच खासदार या चार पाच जागांवर विजयी झालेले असतील. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना जागा मागण्याचा अधिकार असतो. त्यापद्धतीने तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली असेल. पण महायुतीचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो निर्णय महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मान्य करुन त्या उमेदवाराला विजयी करण्याचे काम करतील.जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्यासाठी सगळे जण काम करु आणि त्याला विजयी करु असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे. महायुतीचा धर्म पाळला जाईल, स्थानिक पातळीवर कुरबूरी असतात पण त्या मिटतील आणि महायुतीच्या सर्व जागांवर महाराष्ट्रातुन तीनही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे ४५ खासदार निवडून देण्यासाठी सर्वजण कामाला लागतील. श्री. निलेश लंके यांना पहिल्यापासून लोकसभा लढवायची होती, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनेकदा त्यांची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला की आपल्या मतदारसंघाबाहेर पाच विधानसभा आहेत. जिथून मते मिळविणे कठीण जाईल आणि भाजप विद्यमान खासदार सुजय विखे तिथे असल्यामुळे राष्ट्रवादी ती जागा मागु शकत नाही पण त्यांना लोकसभा लढायची होती त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. ज्यावेळी ४ जूनला मतदान होईल तेव्हा आपल्याला काय निकाल लागेल हे कळेल. जयंत पाटील साहेबांनी जे वक्तव्य केले की राष्ट्रवादी आमदार द्विधा मनस्थितीत आहेत.त्यांच्या पक्षामध्ये राहिलेले उरले सुरलेले आमदार ४ जूनला देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील त्यावेळी त्यांची काय सळो की पळो स्थिती होईल हे जयंत पाटील यांना दिसेल. मला शोले पिक्चरचा एकच सीन आठवतोय, ज्यावेळी जेलर असरानी बोलतो, आधे इधर जाव आधे उधर जाधव बाकी मेरे पिछे आव अशी अवस्था होऊ नये हीच त्यांना सदिच्छा देतो, असे आनंद परांजपे यांनी सांगितले.
चौकट
देशामध्ये ४०० पार आणि महाराष्ट्रात अबकी बार ४५ प्लस पार हा नारा महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेला आहे.आमचा सगळ्यांचा संकल्प आहे की ज्यावेळी ४ जूनला मतमोजणी होईल त्यावेळी महाराष्ट्रातुन ४५ प्लसहून अधिक खासदार हे महायुतीतुन निवडून आलेले असतील आणि माननीय नरेंद्र मोदीसाहेब हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधानपदाची शपथ घेतील हाच विजयसंकल्प आम्ही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केलेला आहे.