Tuesday, June 2 2020 3:25 am

दुसऱ्यादिवशीही महापालिकेची धडक कारवाई ; फुटपाथवरील बांधकामे जमीनदोस्त

ठाणे : अतिक्रमणमुक्त फुटपाथ, अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवरील कारवाईच्या दुसऱ्या दिवशी जवळपास ३६ फेरीवाले, १७३ हातगाड्या, ४१ टपऱ्या,२१ पोस्टर्स, १७ बॅनर्स आणि ३०६ फुटपाथवरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. सदरची कारवाई महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मागर्दर्शनाखाली करण्यात आली.

कालपासून ठाणे शहरामध्ये विविध परिसरात अतिक्रमण कारवाई जोरात सुरु आहे. कारवाईच्या आजच्या दुसऱ्या दिवशी जवळपास ३६ फेरीवाले, १७३ हातगाड्या, ४१ टपऱ्या,२१ पोस्टर्स, १७ बॅनर्स आणि ३०६ फुटपाथवरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

या कारवाई अंतर्गत वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील ४० हातगाड्या, ७ पोस्टर्स, दिवा प्रभाग समितीमध्ये ७ हातगाड्या, २० बॅनर्स, माजिवडा प्रभाग समितीमध्ये ५ फुटपाथवरील अतिक्रमणे, १२ फेरीवाले, ३५ हातगाड्या, २ पोस्टर्स, १ बॅनर्स, वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये ७० फुटपाथवरील अतिक्रमणे, २६ फेरीवाले, नौपाडा प्रभाग समितीमध्ये ६० फुटपाथवरील अतिक्रमणे, १० हातगाड्या,५ बॅनर्स,लोकमान्य सावरकर प्रभाग समितीमध्ये २० फुटपाथवरील अतिक्रमणे, ३१ हातगाड्या, ०५ पक्क्या टपऱ्या, ६ बॅनर्स, कळवा प्रभाग समिती २५ फुटपाथवरील अतिक्रमणे, १७ हातगाड्या, ८ पक्क्या टपऱ्या,१२ पोस्टर्स, दिवा प्रभाग समितीमध्ये ३८ फुटपाथवरील अतिक्रमणे, १८ हातगाड्या,५ बॅनर्स,मुंब्रा प्रभाग समितीमधील ८ लाकडी बाकडे, ९ लोखंडी स्टॅन्ड, २ मच्छी टब, ३ शेगडी, २ सिलिंडर, १ चप्पल स्टॅन्ड, २२ ठेले, ५ वेदर शेड तर उथळसर प्रभाग समितीमध्ये ३८ फुटपाथवरील अतिक्रमणे, १७ हातगाड्या,२२ पक्क्या टपऱ्या निष्कासित करण्यात आल्या.

सदरची कारवाई सर्व सहाय्यक आयुक्त यांनी पोलिस बंदोबस्तात केली. शहरातील अतिक्रमण, अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवरील ही कारवाई शुक्रवारपर्यंत चालणार आहे.