Tuesday, May 20 2025 12:05 am

दीपावलीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

मुंबई, 10 : राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता व सुख-शांती घेऊन येवो. हा सण साजरा करताना ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करतो व सर्वांना दीपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.