Friday, December 13 2024 12:24 pm

दिव्यात भाजप आणि शिंदे गटात धुसफूस

ठाणे, १० ठाणे राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता असताना राज्यातील सत्ताबदलाचे केंद्रबिंदू ठरलेल्या ठाण्यात मात्र, भाजप आणि शिंदे गटातील मतभेद टोकाचे होत असलेले दिसत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा शहरात रुग्णालय उपलब्ध व्हावे यासाठी भाजपने प्रभाग समितीवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी टिका केली केली. दिव्यात भस्मासूरासारख्या इमारती उभ्या करायच्या आहेत. त्यातून पैसा आणि सत्ता निर्माण करणे इतकेच मढवी यांचे ध्येय असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राज्यात सत्ता असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजप आणि शिंदे गटामधील धूसफूस चव्हाट्यावर येताना दिसत आहे.