Tuesday, June 2 2020 3:29 am

दिव्यातील त्या पाच इमारती आणि चाळींचे पाणी, वीज पुरवठा खंडीत, पालिकेची कारवाईला सुरवात

ठाणे  – उच्च न्यायालयाने दिव्यातील खारफुटींची कत्तल करुन त्यावर उभारण्यात आलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाई करण्याचे आदेश ठाणे महापालिकेला दिले होते  त्यानुसार शनिवारी सुट्टीच्या दिवशी पालिकेचे अतिक्रमण विभाग पोलीस बंदोबस्तामध्ये दिव्यात दाखल झाले. सुरवातीला नागरीकांना या कारवाईस विरोध केला. मात्र अनेकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्या पाच इमारती, चाळी अशा तब्बल 55 कुटुंबांचे पाणी आणि वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तर या इमारती आणि चाळींना जाणा:या जलवाहीनी काढण्यात आल्या असून पंपही जप्त करण्यात आले आहेत. आता या इमारतींवर सोमवारी हातोडा टाकण्याची मोहीम पालिका राबविणार आहे.मुंब्य्रातील माहिती अधिकार कार्यकर्ते इराकी आरीफ नवाज यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी यावर सुनावणी होऊन दिवा आणि मुंब्य्रातील अशा प्रकारे खारफुटींची कत्तल करुन उभारण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले होते.
त्यानुसार शनिवारी साप्ताहीक सुट्टीच्या दिवशीच उपायुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली 180 पोलीस बंदोबस्तासह पालिकेचे 12 अधिकारी आणि इतर पथके दिव्यात दाखल झाली. परंतु या सर्वाना दिव्यात शिरण्यापासून संतप्त रहिवाशांनी रेल्वे फाटकाजवळच रोखले होते. त्यामुळे काही काळ वांदग निर्माण झाला होता. तो दुपार र्पयत सुरुच होता. त्यामुळे अशांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त जोशी यांनी दिली. दरम्यान काही काळानंतर संतप्त जमावातून मार्ग काढीत पालिकेचे पथक दिव्यातील त्या पाच इमारतींच्या ठिकाणी पोहचले, यावेळी या पथकामार्फत या इमारतींसह खारफुटींची कत्तल करुन उभारण्यात आलेल्या चाळीचे पाणी आणि वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तसेच जलवाहीन्या सुध्दा तोडण्यात आल्या असून पंपही जप्त करण्यात आले आहेत. या ठिकाणी 55 कुटुंबांचे वास्तव्य असल्याची माहिती पालिकेने दिली. पालिकेच्या माध्यमातून अचानकपणो ही कारवाई झाल्याने मोठय़ा कष्टाने हक्काचे घर घेणा:यांचे मात्र यामुळे चांगलेच हाल झाल्याचे दिसून आले. तर एका स्थानिकाच्या बंगल्याचेही पाणी, वीज कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे.  दरम्यान आता येथील रहिवाशांना घरे खाली करण्याचे आवाहन करण्यात आले असून सोमवारी पासून या बांधकामांवर कारवाई केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.
15 हजार कुटुंबांवर टांगती तलवार
उच्च न्यायालयाने दिवा व मुंब्रा भागातील खारफुंटीची कत्तल करुन त्या ठिकाणी उभारलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने आता येथील 12 हजार कुटुंबाचे वास्तव असून दिव्यात खारफुटींवर भरणी करुन 10 हजारांच्या आसपास चाळींचे निर्माण करण्यात आले असून एक डझनच्या आसपास 5 ते सहा माळ्यांच्या इमारतीं उभारण्यात आल्या आहेत. केवळ काही लाखांत आपल्या आयुष्याची जमापुंजी साठवून अनेकांनी ही घरे घेतली आहेत. तर दुसरीकडे मुंब्य्रातही 10 ते 15 वर्ष पूर्वीची तब्बल 40 ते 45 इमारती असून यावर सुध्दा कारवाईची टांगती तलवार आली आहे.