Saturday, April 20 2019 12:21 am

दिवाळीच्या सुट्टीत एस टी प्रवास महागणार

मुंबई : सर्वसामान्यांची लालपरी असणारी  एस.टी चा प्रवास येत्या  दिवाळी सुट्टीत महागणार असून सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे.राज्य परिवहन महामंडळाने दिवाळी सुट्टीच्या कालावधीत 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर च्या कालावधीत ही भाडेवाढ असेल. ही भाडेवाढ 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले.गेल्यावर्षी  दिवाळीच्या सुट्टीत सेवाप्रकार निहाय १० ते २० टक्के अशी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

एस.टी. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्केपर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार प्रतिवर्षीप्रमाणे गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येणार आहे.

Tags: