Monday, June 1 2020 1:37 pm

दापोली-खेड मार्गावर भीषण अपघात, अपघातात ५ जण ठार,तर २ जण गंभीर जखमी

रत्नागिरी -: रत्नागिरीतील दापोली-खेड गवानजीकच्या मार्गावर भीषण अपघात झाले. भरधाव मक्झिमो गाडीची डंपर ला जोरदार धडक लागल्याने हा अपघात घडला आहे. वेगात असलेल्या मक्झिमो गाडीने मार्गावर असलेल्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, आणि समोरून येणाऱ्या डँपरला जोरदार धडक लागली. आणि हा भयाण प्रकार घडला. मक्झिमो गाडीमध्ये ७ जण बसले होते, ओव्हरटेक केल्यामुळे गाडीत बसलेले ५ जण जागीच ठार झाले, तर २ जर गंभीर जखमी झाले आहेत . मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. नारगोली इंद्रधनु बागेजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातानंतर रत्नागिरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या अपघाताचा तपास सुरु आहे.