Tuesday, December 1 2020 1:28 am

दापोलीत २६ वर्षीय महिलेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

दापोली : दापोली तालुक्यातील सोवेली गावात सिद्धी ऊर्फ माधुरी प्रथमेश लाड या २६ वर्षीय महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सिद्धी हिने आपली दोन मुले प्रणित (३), स्मित (२) यांच्यासह सोवेली चव्हाण वाडीत एका विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान तिने घरगुती वादातून हे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे. काही किरकोळ वादातून तिने हे टोकाचे पाऊल उचल्याचे सांगितले जात आहे. सून आणि सासू यांच्यात काही कारणाने वाद झाल्याने सिद्धी ही नाराज होती. त्यामुळे ती २७ ऑक्टोबर रोजी रात्री आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडली.

ती पुन्हा घरी न आल्याने शोध घेतला. त्यावेळी शोध घेतला. मात्र, बुधावारी सकाळी वाकण येथील विहितीत या तिघांचे मृतदेह आढळून आलेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आता पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेने मुळे सोवेली गावावर शोककळा पसरली हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.