Thursday, June 20 2019 3:26 pm

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे रंगला ठाणे विरुध्द ऑस्ट्रेलिया असा क्रिकेट सामना

ठाणे:- ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे क्रिकेटपटूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार करण्यात आलीआहे. अनेक वर्षानी या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया विरुध्द ठाणे हा सराव सामना रंगला. हा सराव सामना पाहण्यासाठी क्रिकेटरसिकांनी मोठी गर्दी केली होती. 16 वर्षाखालील गटात झालेला क्रिकेटचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरली. या सरावसामन्यात ठाणे सेंटर संघ 3 गडी राखून विजयी झाला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एकदिवसीय क्रिकेटसामन्याचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी दिली. दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृहातील खेळपट्टी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची तयार करण्यात आली आहे. या खेळपट्टीवरखेळण्याचा सराव व्हावा यासाठी या एकदिवसीय क्रिकेट सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील ठाणे सेंटरसंघ विरुध्द ऑस्ट्रेलिया असा 35 षटकांचा सराव सामना आज दिनांक 15 एप्रिल, 2019 रोजी रंगला. हा सराव सामनापाहण्यासाठी ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे तयार करण्यात आलेली धावपट्टी हीउत्तम दर्जाची असून याची माहिती ऑस्ट्रेलिया येथे देणार असल्याचे ऑस्ट्रेलिया 16 वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक ब्रूस वूड(Bruce Wood) यांनी नमूद केले.