Friday, May 24 2019 7:07 am

दादर आणि वसई रोड स्थानकांतील पादचारी पूल बंद

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर आणि वसई रोड स्थानकांतील पादचारी पूल आजपासून (14 मे) बंद करण्यात येणार आहेत. दादर च्या  प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 4 दरम्यान हा पूल येतो. प्रवाशांनी ४ पादचारी पुलाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 7 वरील मध्यवर्ती पादचारी पुलाचा उत्तरेकडील जिना १४ मेपासून ते २९ मेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत जिन्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या दरम्यान पर्यायी पुलाचा वापर करावा, असं आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल दुर्घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुलाची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यास जलद गतीने सुरुवात केली आहे. यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण 42 नवीन पादचारी पूल, पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी 100 कोटी 87 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.