Sunday, July 5 2020 9:09 am

दाऊद ला भारतात परत यायचं आहे : ऍड. श्याम केसवाणी

ठाणे :दाऊद इब्राहिमला भारतात परत यायचं आहे. पण त्याची एक अट आहे, त्याच्यावर भारतात खटला सुरु असतांना त्यास फक्त आर्थर रोड तुरुंगातच ठेवण्यात यावे. अशी खळबळ जनक माहिती दाऊदचे फॅमिली वकील व सध्या इक्बाल कासकरचा खटला लढवत असलेले वकील ऍड. श्याम केसवाणी यांनी मंगळवारी ठाणे कोर्टात दिली. तीन पैकी दोघा खंडणीच्या गुन्ह्यात इक्बाल यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने गोराई येथील जमीन प्रकरणात बिल्डरकडून खंडणी उकळल्याच्या तिसऱ्या गुन्ह्यात इक्बालला पुन्हा पोलीस कोठडी चौकशीसाठी घेतले आहे. या तिसऱ्या गुन्ह्यातील सहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर इक्बाल यास मंगळवारी ठाणे विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू असून इक्बालच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी विनंती न्यायालयास केली. त्यानुसार ठाणे विशेष न्यायालयाने इक्बालच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली.