Monday, May 19 2025 10:50 pm

दलितमित्र पुरस्कार प्राप्त एकनाथ बिरवटकर यांचा पोयनार आलाटीवाडी ग्रामस्थांकडून सत्कार गौरव

खेड, 05 -(प्रतिनिधी) महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा दलितमित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका येथील पोयनार आलाटीवाडी ग्रामस्थ व शेवरोबा मंडळाचे अध्यक्ष सुनील महाडिक, श्री अजयजी बिरवटकर, श्री संदिपजी कांबळे व इतर पदाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. पोयनार आलाटीवाडी येथे शिमगा उत्सवात पालखी सोहळ्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ उपस्थित असताना हा गौरव सोहळा पार पडला.याप्रसंगी सरचिटणीस संदीप बिरवटकर , कोषाध्यक्ष अनिल तटकरे उपाध्यक्ष राजाराम गायकर,स्वप्नील तटकरे,निलेश महाडिक , योगेश महाडिक , अशोक बिरवटकर , विलास बिरवटकर , भरत बिरवटकर,गणेश बिरवटकर, दिलीप बिरवटकर, गणेश मिरगळ, विजय बिरवटकर, हेमंत मोडसिंग, दत्ताराम बिरवटकर, अजित खेडेकर , रोहन भोजने यांच्यासह अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकनाथ बिरवटकर यांनी गेल्या अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता करत असताना अनेक पत्रकारांना व्यासपीठ उभारून त्यांना लिहिते केले आहे. दलित वंचित उपेक्षित बांधवांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले आहे. पत्रकारिता करत असताना समाजातील अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे.विविध विषयावर विस्तृत लेखन त्यांनी केले आहे समाजाच्या विविध विकास कामांना प्राधान्याने प्रसिद्धी देऊन शासनाचे सकारात्मक धोरणांना तळागाळापर्यंत पोहोचवले आहे. अशा सर्व कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार दिला आहे. हा पुरस्कार गौरव सोहळा फक्त तालुक्याचा गौरव नाही समस्त समाजाचा गौरव आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचे सुपुत्र एकनाथ बिरवटकर यांच्या कडून अनेक विकास कार्य होत राहोत अश्या शुभेच्छा शेवरोबा मंडळाचे सरचिटणीस संदीप बिरवटकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिल्या आहेत.