Tuesday, July 23 2019 2:14 am

दत्ता पडसलगीकर यांनाच पुढील दीड वर्षे अजून पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात येण्याचे संकेत मिळाले

दरम्यान ८ जानेवारीच्या सुनावणीत राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना २०२० पर्यंत पोलीस महासंचालक पदावर ठेवण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. तशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात राज्य शासन व केंद्राकडून सादर करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर दत्ता पडसलगीकर यांनाच पुढील दीड वर्षे अजून पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात येण्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.