Monday, June 1 2020 2:45 pm

थोरातांनी आता घरी बसायला हारकत नाही ; उद्धव ठाकरे

मुंबई :- बाळासाहेब थोरात यांनी आता घरी बसायला हारकत नाही  अश्या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ‘ते थोरात, आम्ही जोरात’ त्यामुळे नगर जिह्यात 12 – 0 असा निकाला लागणार असून, संगमनेरमध्ये भगवा फडकरणारच असा विश्वासही त्यांनी बुधवारी व्यक्त केला.       कोणी कितीही डोके आपटले तरी नगर जिह्यात भगवा फडकणारच. कामे मार्गी लागली असल्यानेच पुन्हा युती झाली आहे. आता युती झाल्याने वादावादी नको. सत्तेत आल्यावर शेतकऱयांचा सातबारा कोरा करणार. तसेच एक रुपयामध्ये प्राथमिक आरोग्य चाचण्या करुन देण्याची सोय करणारच. ज्यांना तिकीट मिळाले नाही, त्यांची मी माफी मागतो, असेही  उद्धव ठाकरे म्हणाले.