Saturday, April 20 2019 12:29 am

“थीम पार्क एक झाकी है,अभी तो बॉलिवूड पार्क,सुगंधी वृक्ष बाकी है” आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी असे म्हटल्यावर सभागृह नेते नरेश म्हस्के यांचे धाबे का दणाणले – नारायण पवार

ठाणे : थीम पार्क वरून चांगलेच राजकारण तापले असून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलेच शीत युध्य रंगले आहे.आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी असे म्हटल्यावर सभागृह नेते नरेश म्हस्के यांचे धाबे का दणाणले असा सवाल आता भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी उपस्तित केला आहे.
सोमवारी भाजपचे आमदार संजय केळकर आणि नगरसेवकांनी थीमपार्कचा पाहणी दौरा करून यामध्ये ८२ टक्क्यांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत केळकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. यावर नुकतीच सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिका चौकशी करण्यास समर्थ असुन आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी कशाला करावी असा सवाल केला.आर्थिक गुन्हे शाखे तक्रार करावी असे म्हटल्यावर नरेश म्हस्के यांचे धाबे का दणाणले असा सवाल भाजपचे गटनेते नगरसेवक नारायण पवार यांनी पत्रक काढून उपस्तित केला.दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी अशी मागणी केल्यानंतर महापालिका लगेच समर्थ कशी होते?मग सत्ताधारी शिवसेना इतके दिवस काय पाहणी दौऱ्याची वाट बघत होते का ?जर महापालिका समर्थ आहे तर ४८ तासात चौकशी समिती स्थापन का केली नाही असा सवाल देखील नारायण पवार यांनी उपस्तित करून शिवसेनेला एकप्रकारे आवाहन दिले आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत म्हस्के यांनी हिम्मत असेल तर सुगंधी झाडे लागवडीची चौकशी करण्याची मागणी केळकराकडे केली होती.म्हणजेच यामध्ये एकप्रकारे भ्रस्टाचार असल्याचे त्यानी मान्यच केले आहे कि काय असे बोलत मग महापालिका चौकशी करण्यास समर्थ आहे,मग घोडे अडले कुठे असा सवाल यावेळी उपस्तित करीत “थीम पार्क एक झाकी है,अभी तो बॉलिवूड पार्क,सुगंधी वृक्ष बाकी है” असे पवार बोलले.