Tuesday, September 22 2020 7:43 am
ताजी बातमी

थायरोकेअर लॅबला कोव्हीड 19 चेस्वॅब तपासणी करण्यास बंदी असमाधानकार ककोविड चाचणी सुविधेबद्दल महापालिकेचा निर्णय

ठाणे:थायोरोकेअर लॅब या आयसीएमआरच्या अधिकृतप्रयोगशाळेत कोव्हीड 19 च्यास्वब तपासणीत 6 प्रकरणात चुकीचा अहवाल आढळल्याने या लॅबलाठाण्यात कोव्हीड 19 चे स्वॅबतपासणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिला आहे.
ठाणे शहरात कोरोना कोव्हीड – १९ची प्राथमिकलक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची कोव्हीड – १९ची तपासणी शासनमान्यप्रयोगशाळेकडेच करण्यात येते. थायोरोकेअर लॅब आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेच्यायादीमध्ये घोषित करण्यात आली होती. परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदरप्रयोगशाळेने दिलेल्या 6 प्रकरणांमध्येचुकीचा अहवाल असल्याचे आढळून आले. यामुळे अनेक रूग्णांना सामाजिक आणि मानसिकत्रासातून जावे लागले होते.
त्यामुळे २२ मे २०२० पासून ठाणे महानगरपालिकाक्षेत्रातील संशयितांसाठी कोविड -19 स्वॅबगोळा करू नये असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. कोविडचाचणी बाबत असमाधानकारक सुविधा दिल्यामुळे महापालिकेच्यावतीने हा निर्णय घेण्यातआला आहे.