Tuesday, July 23 2019 2:10 am

थँडीच्या गारठ्याने ३ दिवसात ५ जणांचा बळी !

नागपूर-: सध्या राज्यभरात थँडीचा अंश वाढत चालला आहे, वाढत्या थन्डीमुळे वातावरणात गारवा कमालीपेक्षा वाढल्यामुळे आणि ह्या कडाक्याच्या थंडीमुळे नागपुरात गेल्या 3 दिवसात 5 जणांचे बळी गेला आहे. थंडीची लाट असताना रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी शेल्टर होमची व्यवस्था करणं तर दूर, साधा थंडीचा अलर्टसुद्धा प्रशासनाने दिलेला नाही. त्यामुळे नागपूर प्रशासन सुस्त झोपेत असल्याचं चित्र सद्या पहावयास मिळत आहे.नागपूरचा पारा 3.5 अंशापर्यंत खाली आला होता. रविवारी 4 डिग्री सेल्सिअस एवढं किमान तापमान नागपुरात नोंदविण्यात आलं.

थंडीच्या लाटेत रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचे मोठ हाल होतात. थंडीमुळे गेल्या 3 दिवसांत नागपुरात 5 जणांनी आपला जीव गमावला. सीताबर्डी, गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्या. तर निवारा नसल्यामुळे अन्य तिघांचा कामठी, बजाजनगर आणि कळमना परिसरात बळी गेला. पोलीस मृतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.