Monday, April 6 2020 3:14 pm

“तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज, – गणेश नाईक

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. आता भाजप नेते गणेश नाईक यांनीही आव्हाडांना उत्तर दिलं आहे. “तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज, और बाप ने नाम पूछा तो बोल गणेश नाईक”, असं उत्तर नाईक यांनी दिलं आहे.येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोपरखैरणेत पार पडलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर जोरदार हल्लाबोल केला. “गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याचा बळी दिला,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. गणेश नाईक यांनीही जितेंद्र आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.