Thursday, December 12 2024 7:41 pm

तुकाराम महाराज मंदिर सोहळ्याचे भाजपाकडून ठाण्यात थेट प्रक्षेपण

ठाणे, दि. १४ (प्रतिनिधी) : देहू येथील जगद्गगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालेल्या लोकार्पण सोहळ्याचे भाजपाकडून ठाण्यात आज थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याचबरोबर कोपरी येथील मंदिरात प्रवचन व भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम ठाणेकरांना पाहता यावा, यासाठी ठाण्यात थेट प्रक्षेपण करण्यात आले. `नमो तुकोबा – नमो विठोबा’नुसार कासारवडवली येथील श्री राम मंदिरात झालेल्या कार्यक्रमास आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, मंडल अध्यक्ष राम ठाकूर यांच्यासह भाविक व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या वतीने कोपरी येथील मंदिरातही ह. भ. प. सखाराम महाराज इंदोरे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्यालाही आमदार डावखरे व संजय केळकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या ठिकाणीही शेकडो भाविक उपस्थित होते.