Sunday, September 15 2019 3:53 pm

तिसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेचा खोळंबा

मुंबई – ऐन चाकरमानी कामावर जाण्याच्या वेळेसच मध्य रेल्वेचा सलग तिसऱ्या दिवशी खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी सकाळी कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू असून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी त्रासाला सामोर जावं लागल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे.

याआधी मंगळवारी (11 जून) सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान लोकल 15 ते 20 मिनिटे थांबल्या होत्या. त्यामुळे वाहतूक उशिराने सुरू होती. तर सोमवारी (10 जून) पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती