Wednesday, March 26 2025 5:49 pm

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ठामपा शाळांच्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प अव्वल

ठाणे, 20- तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ठाणे महानगरपालिका शाळांनी बाजी मारली आहे. ठाणे मनपाचे सर्व शाळांतील ठाणे मनपा शाळा क्रं ६५/८ यांनी सादर केलेला प्रकल्प कचरा ए टि एम यास प्रथम क्रमांक, ठाणे मनपा शाळा क्रं. २६/७ यांनी सादर केलेला प्रकल्प आरोग्य स्वच्छता यास द्वितीय क्रमांक तर ठाणे मनपा शाळा क्रं ९८/५ यांनी सादर केलेला प्रकल्प शालेय स्तरावर कचरा व्यवस्थापन यास तृतिय क्रमांक मिळाला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व आवड निर्माण करून सामाजिक व पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन तंत्रज्ञान आणि खेळणे या मुख्य विषयानुसार माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि नवोपक्रम, पर्यावरणीय चिंता, वर्तमान नवोक्रमासह ऐतिहासिक विकास व आमच्यासाठी गणित या विषयांवर आधारीत ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाचे वतीने नुकतेच ठाणे महानगर पालिका शाळा क्र. ४४, वर्तकनगर, ठाणे येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ठाणे महानगरपालिका प्राथमिक शाळा, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित मान्यता प्राप्त प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले होते. या प्रकल्पाचे तीन परीक्षकांमार्फत परिक्षण करण्यात आले. तसेच सर्व ठामपा शाळांमधून ठाणे मनपा शाळा क्रं ६४ / ६यांनी सादर केलेला प्रकल्प टाकाऊ पासून पाण्याचा पंप व ठाणे मनपा शाळा क्रं १०२/४ यांनी सादर केलेला प्रकल्प कॅरमबोर्डचा शैक्षणिक वापर यास उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे.

शिशू विकास मंदिरच्या प्रकल्प स्पिड ब्रेकर हायवेवरती वीज निर्माण करू प्रथम तर सेंट झेविअर स्कूल, मानपाडा द्वितीय ठरला.. गटनिहाय प्रकल्पांमध्ये प्रकल्प पर्यावरण समतोल करून पुनर्वापर, प्रकल्प कागदाची पुनर्निर्मिती प्रकल्प हैंड सॅनिटायझर, प्रकल्प पूरसूचक यंत्र, प्रकल्प ग्लोबल वॉर्मिंग, प्रकल्प मातीविरहित बाग, प्रकल्प १ लीटर पाण्यात वृक्षारोप, प्रकल्प रेन हारेस्टिंग हायड्रो इलेक्ट्रिसिटी हि सर्व प्रकल्प गटामध्ये बक्षिस पात्र ठरली आहेत.