Thursday, November 15 2018 2:23 pm

तळोजा एम्आयडीसी कंपनीत भीषण स्फोट, कल्याणमधील १४ गावांना हादरे

मुंबई :तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. केमिकलच्या ड्रमला जेसीबीचे फावडे लागल्याने भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खड्डा खणताना सकाळी ही घटना घडली आहे. यामध्ये जेसीबी चालवणारे एक कामगार जखमी झाला आहेत.स्फोटाची माहिती मिळताच तळोजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले सोबत अग्निशमन दलदेखील घटनास्थळी दाखल झाले . दरम्यान, हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे त्या परिसरच्या बाजूचे  १४  गावांना भूकंपसदृश्य हादरे बसले आहेत.