डोंबिवली : डोंबिवलीत आज सकाळपासून अपघातांची मालिका सुरू आहे. शहरातील दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले असून खांबाळपाडा येथे दुचाकीला भरधाव ट्रकची धडक बसून ह्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले आहेत.तर दुसऱ्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे.
आज सकाळी गणेश चौधरी हे आपल्या पत्नी व मुलांसह आपल्या दुचाकीवरून कल्याणहून डोंबिवली कडे निघाले होते. कल्याण शीळ रस्त्यावरून खंबाळपाडा येथे दुचाकी गाडीचा वळण घेत असताना त्यांचा अपघात झाला. ह्या अपघातात गणेश चौधरी त्यांची पत्नी उर्मिला चौधरी आणि त्यांची मुलगी हंसिका ह्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा देवांश दुचाकीच्या बाहेर फेकला गेल्यामुळे बचावला गेला आहे .तो किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.याप्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत .
दुसऱ्या दुर्घटनेत कल्याणातील प्रभाकर ठोसे या दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. डोंबिवली घारडा सर्कल येथे दुचाकीवरून शाळेत जात असताना कचऱ्याच्यागाडीची धडक बसल्याने प्रभाकर ठोके यांचा मृत्यू झाला. प्रभाकर ठोके हे डीएनसी शाळेत सह शिक्षक म्हणून काम करीत होते.ह्या दोन्ही अपघातामुळे डोंबिवली शहरात वातावरण शोकाकूळ आहे .