Thursday, January 28 2021 7:52 am

डोंबिवलीत विश्वविक्रमी सामुहिक स्तोत्रपठण

डोंबिवली –  बालसंस्कार शिबिराच्या वतीने नेहमी मुलांवर चांगले संस्कार केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून  अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ , श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने डोंबिवलीतील पाच ठिकाणी १ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकाच वेळी विश्वविक्रमी सामुहिक स्तोत्रपठण केले. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड याची नोंद होणार आहे.यावेळी ११ शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवून दहा मंत्र ३ आणि ११ स्तोत्र पठन केले. रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवलीतील नेहरू मैदानातील साई बाबा मंदिर,जोंधळे शाळा, महात्मा गांधी शाळा, कोपर रोड केंद्र, समाज मंदिर या पाच ठिकाणी विद्यार्थ्यांनी सकाळी दहा वाजून पंच्चेचाळीस मिनिटाला सुरु केले स्तोत्रपठण एक तास सुरु होते. यावेळी बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे कार्यकर्ते व पालकवर्ग उपस्थित होते. मंदिरात सुरु असलेले सामुहिक स्तोत्रपठण ऐकताना उपस्थित भक्तीत तल्लीन झाले होते. उन्हाळी आणि हिवाळी शिबिरात मुलांना संस्काराबरोबर त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्पर्धा घेतल्या जातात.डोंबिवलीत तर अश्या कार्यक्रमांना डोंबिवलीकरांनी नेहमीच गर्दी केली आहे. विश्वविक्रमी स्तोत्रपठणानंतर पर्यावरणाचा समतोल राखावा आणि झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. मुख्य सेवेकरी सेवेकरी चारुलता राणे, विनोद राणे यांच्यासह अनेक सेवेकरींनी यावेळी अथक मेह्नत घेतली. विश्वविक्रमी सामुहिक स्तोत्रपठण स.वा जोशी, स्वामी विवेकानंद दत्तनगर, रामनगर, मंजुनाथ, टिळकनगर, मातोश्री विद्यामंदिर, शिवाई बालक मंदिर, संत तुलसीदास विद्यामंदिर,बाबा गेनू विद्यामंदिर,राजेंद्र प्रसाद विदुयामंदिर ( ठाकुर्ली ) इत्यादि शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.