Sunday, September 15 2019 11:06 am

डोंबिवलीत लोकलमधून पडून एका तरुणीचा मृत्यू

ठाणे :- डोंबिवलीवरुन सीएसएमटी ला जाणाऱ्या जलद लोकल मधून पडुन एक तरुणीचा मृत्यू झाला आहे. सविता नाईक असे मृत पावलेल्या तरुणीच नाव आहे. कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून या तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

मध्य रेल्वेच्या कल्याण, डोंबिवली या स्थानकांवर कायमच मोठ्याप्रमाणावर गर्दी असते. अशा गर्दीच्यावेळीच लोकलमधून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहे. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. डोंबिवलीतील एका तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे.

अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे. घटनास्थळी जीआरपीचं पथक दाखल झालं आहे. सविता नाईक असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव असून या तरुणीचा मृतदेह डोंबिवलीत आणला जाणार आहे.