Thursday, December 12 2024 7:24 pm

डॉ. मृणाल सावर्डेकरचे एमबीबीएस मध्ये यश

ठाणे, (७) : चिपळूण तालुक्यातील तुरुंबव गावचे
सुपुत्र आणि ठाण्यातील व्यवसायिक व मनसेचे ठाणे शहर सचिव प्रदीप सावर्डेकर यांची कन्या डॉ.मृणाल ममता प्रदीप सावर्डेकर हिने एमबीबीएस परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केली असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ. मृणाल सावर्डेकर हिला लहानपणापासून शिक्षणाची ओढ असल्याने तिला डॉक्टर व्हायचे होते.
कठोर मेहनत घेऊन तिने हे यश मिळविले असून आपल्या यशामध्ये आपल्या आई- वडिलांचे मोठे योगदान असल्याचे डॉ. मृणाल हिने सांगितले. तिच्या यशाबद्दल चिपळूण तालुक्यातून व ठाणे शहरातून तिच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मनसेचे नेते अविनाश जाधव सह ठाणे शहर सचिव नैनेश शिरकर यांच्यासह अनेक मनसैनिकांनी तिला शुभेच्छा दिल्या.