शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा संघर्षाच्या गडकिल्ले स्पर्धेत आव्हाड यांनीच केला होता सत्कार !
ठाणे, 8 : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाच्या मांडणीबद्दल मतभेद असू शकतात पण त्यांच्या योगदानाचा व वयाचा विचार करता त्यांच्याप्रती आदराने बोला, एकेरीत उल्लेख टाळा, असा सल्ला तत्कालीन प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी डॉ जितेंद्र आव्हाड यांना दिला होता म्हणजे ती धमकी होत नाही. मुळात शिवशाहीरांचा, संघर्ष संस्थेने भरविलेल्या किल्लेदर्शन स्पर्धेच्यावेळी आव्हाड यांनी स्वतः सत्कार केला होता. मा. आदितीताई या स्वकर्तृत्वाने पुढे आल्या आहेत, कामातुन आपली ओळख आदितीताईंनी निर्माण केली आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहास मांडणीबद्दल मतभेद असू शकतात. इतिहास हा नेहमी बदलत असतो. कायम नवनवीन पुरावे येत असतात. यामुळे इतिहासाबद्दल बोलणे, चर्चा करणे, वाद घालणे यात काही चुकीचे नाही. आमच्या सर्वाचे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांनीही शिवशाहीरांना आदरांजली वाहताना, त्यांनी आपल्या व्याख्यानाद्वारे व गडकिल्ल्यांद्वारे, शिवछत्रपतींचा इतिहास घरोघरी पोहोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य केल्याचा आदराने उल्लेख केला आहे. पण डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा नेहमी एकेरीने उल्लेख केला आहे. प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी शिवशाहीरांच्या, शिवछत्रपतींची इतिहास सर्वसामान्यपर्यंत पोहोचविण्याच्या, गडकिल्ले यांच्याबाबत तरुणाईला जागरुक करण्याचे योगदान व त्यांचे वय याचे भान राखून त्यांच्यावर टीका करताना आदर बाळगा, असा सल्ला आव्हाड यांना दिला होता. याला आव्हाड धमकी समजतात.आव्हाडांना कोणी धमकी देऊ शकतो यावर कोणाचाच विश्वास बसणार आहे का?, असा प्रश्न आनंद परांजपे यांनी उपस्थित केला.
२०१७ च्या रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात स्थानीय पातळीवर युती झाली होती. विजयानंतर अडीच वर्षे राष्ट्रवादीचा अध्यक्ष व अडीच वर्षे शेकापचा अध्यक्ष अशी बोलणी प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे, शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, आ. विवेक पाटील, आ. मिनाक्षी पाटील यांच्यात झाली होती. यानुसार आदितीताई तटकरे या अडीच वर्षे अध्यक्ष झाल्या होत्या. नंतर आघाडी सरकारमध्ये पालकमंत्री असताना रायगड मधील पुरात व नैसर्गिक आपत्तीत त्यांनी भर पावसात धावपळ केली होती. आताही महिला व बालविकास मंत्री म्हणून त्या सक्षमपणे कार्यरत आहेत. शिवाजी हाॅस्पिटलच्या दुर्घटनेच्यावेळी त्यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली होती. ना आदितीताई तटकरे या स्वकर्तृत्वावर पुढे आल्या आहेत, कमी बोलणे पण जास्त काम करणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. यामुळेच आदितीताईंचा राष्ट्रवादीला अभिमान आहे, असे आनंद परांजपे म्हणाले.