Wednesday, December 2 2020 4:58 am

डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहण्याचा संजय केळकर यांचा निर्धार

ठाणे : समाजातील सर्व घटकांना भेट देणाऱ्या ठाणे विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी ठाण्यातील इंडियन मेडिकल असोशिएशनच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले. समाजाचे आरोग्य संभाळणाऱ्या डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी संजय केळकर यांनी दिले असून डॉक्टरांनी देखील केळकर यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
ठाणे विधानसभा क्षेत्रातील उमेदवार संजय केळकर यांची सुशिक्षित उमेदवार म्हणून  ओळख असून केवळ प्रचार रॅली आणि प्रचार सभांवर भर न देता समाजातील सर्व महत्वाच्या घटकांना भेटण्याचा सपाटा संजय केळकर यांनी लावला आहे . ठाणे शहरातील मराठी, मुस्लिम तसेच इतर समाजातील लोकांना यापूर्वीच संजय केळकर यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे . समजतील सर्वच घटकांकडून केळकर यांना जाहीर पाठींबा मिळत असल्याने त्यांचा विजयचा  अधिकाधिक सोपा होत चालला असला तरी समाजाचे आरोग्य ज्यांच्या हातात आहे तो घटक महत्वाचा असून त्याकडे दुर्लक्ष होऊन चालणार नसल्याने केळकर यांनी ठाण्यातील इंडियन मेडिकल असोशिएशनच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घेतल्या .
मधल्या काळात फायर एनओसी सादर न करणाऱ्या तसेच चेंज ऑफ युजच्या अटींमुळे ठाण्यातील डॉक्टरांवर ठाणे महापालिकेच्या वतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता . हे प्रकरण चांगलेच तापले होते . त्यावेळी देखील केळकर यांनी यासंदर्भात डॉक्टरांची बाजू समजून घेतली होती. मात्र एन निवडणुकीच्या धावपळीतही या घटकाला दुर्लक्षित करून चालणार नाही यामुळे ठाण्यातील सर्व डॉक्टरांची भेट घेऊन ही महत्वाची समस्या समजून घेऊन निवडणुकीनंतर यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले . केवळ या एकाच मुद्द्यावर नव्हे तर डॉक्टरांच्या सर्वच समस्या सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे आश्वासन देखील सर्व डॉक्टरांना संजय केळकर यांनी दिल्याने या वर्गाला देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे

वाल्मिकी समाजाचा देखील मिळाला पाठिंबा –
संजय केळकर यांना सर्वच घटकांकडून पाठिंबा मिळत असताना  वाल्मिकी जयंतीनिमित्त केळकर  खारटंन रोड येथील वाल्मिकी समाजाच्या वतीने साजरी करण्यात येणाऱ्या जयंती उत्सवात सहभागी झाले होते . दरवर्षी या समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करण्यात येते . यंदाच्या जयंतीमध्ये संजय केळकर यांनी हजेरी लावल्याने उत्साह देखील वाढला होता . वाल्मिकी विकास मंच तर्फे केळकर यांचे स्वागत देखील करण्यात आले .   वाल्मिकी समाजाचे जेष्ठ पदाधिकारी बाबूलाल किर, उपाध्यक्ष मुकेश गेहलोत, सुभाष चिंदलिया, ओमप्रकाश दहनेलवाल, संजय मेहरोल, जगपाल दहनेलवाल, बिपीन गेहलोत आदी पदाधिकारी व समाजतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या समाजाचे काही प्रश्न असल्यास त्यांनी केव्हाही आपल्या हक्काच्या माणसाकडे यावे असे भावनिक आवाहन देखील केळकर यांनी केले . तर या समाजाने देखील संजय केळकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.