Wednesday, August 12 2020 9:41 am

डीजी मीडिया आणि अभिनय कला केंद्रातर्फे फॅशन शो उर्वशी केशवानी ठरली स्टारलेट 2020 सौंदर्यवती तर अभिषेक गाडेकर ठरला मिस्टर परफेक्टनीस

ठाणे: डीजी मीडिया आणि अभिनय कला केंद्र ठाणे प्रस्तुत मिस्टर, मिसेस आणि मिस स्टारलेट 2020 हा फॅशन शो इव्हेंट ठाण्यात काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी मिस स्ट्रारलेट 2020 म्हणून उर्वशी केसवानी, मिसेर्स स्टारलेट 2020 टीना भटनाकर व मिस्टर परफेक्टनीस स्टारलेट 2020 म्हणून अभिषेक गाडेकर आदींची निवड करण्यात आली. यावेळी परिक्षक म्हणून अभिनेता जितेन मेघराजानी, फॅशन डिझायनर अनुजा राव पाटील, ग्रुमींग पार्टनर मॉडेल ऐश्वर्या सिंग, आदींचे सहकार्य लाभले. अनेक कलाकारांना एक सुवर्ण संधी म्हणून अभिनय कला केंद्राचे अध्यक्ष रोहित चंद्रकांत गायकवाड यांनी ठाण्यात हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नरेश म्हस्के आणि नगरसेविका परिषाताई सरनाईक यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाची निर्माती म्हणून मिस ठाणे 2016 व मिस ड्रीम गर्ल ऑफ परफेक्ट महाराष्ट्र सौंदर्यवती श्रद्धा चंद्रकांत गायकवाड यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना आपले कौशल्य रॅम्प वॉल्कच्या माध्यमातून दाखविता आले. अनेक नवख्या तरुण-तरुणींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी स्टारलेटने दिली. कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिवाय स्पॉन्सर पार्टनर म्हणून अल्ट्रा मराठी कृणाल मुसिक चॅनेल, कसबा कॉस्ट्यूम डिझायनर यांनी मुलांचे रंगभुषा व वेशभुषेचे काम पाहिले. बेलापूर इन्स्टिटयूट व विहा ब्रँड मुलींचे आणि महिलांचे रंगभुषा व वेशभुषेचे काम पाहिले.
ट्रॅडिशनल, वेस्टर्न अशा अनेक राऊंड्सने रॅम्पवॉल्कच्या माध्यमातून स्पर्धकांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आणि अखेर वेळ अली होती ती निकालाची कोण जिंकणार याची उत्सुकता परिक्षकांना लागली होती. मिस्टर स्टारलेट 2020 म्हणून अभिषेक गडेकर, मिसेस मध्ये टीना भटनागर आणि मिस मध्ये उर्वशी केसवानी हिनेपहिले पारितोषिक मिळवूंन बाजी पटकावली तसेच मिस्टरमध्ये फर्स्ट रनर अप म्हणून रोहित भोजने सेकंड रनर अप पवन सोनगिरे तसेच मिसेसमध्ये पहिली रनर अप सोनल सामंत, दुसरी रनर अप इंदू हरजाई, मिस मध्ये पहिली रनर अप सायली कदम, दुसरी रनर अप समृद्धी पाटील हिने बाजी पटकावली.
एवढेच नाही अल्ट्रा मराठी चॅनेल कडून सुरेश पितळे यांनी विजेत्यांना आणि इतर स्पर्धकांना अल्बम सोंगमध्ये घेण्याची घोषणा केली. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी श्रद्धा आणि रोहितला पुढचा कार्यक्रम आपण पूर्ण ठाण्यासाठी जोरात करू, असे वाचन दिले. अभिनय कला केंद्र अध्यक्ष रोहित गायकवाड आणि श्रद्धा गायकवाड यांनी नेहमीच काहींना काहीतरी नवीन उपक्रम राबवले आहेत. आणि हा सुद्धा एक नवा उपक्रम त्यांनी राबवला. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि ठाणे महानगर पालिका परिवहन समिती सदस्य राजेश मोरे तसेच नगरसेविका रुचिता मोरे यांचा नेहमीच मोठा पाठिंबा या कलाकारांना मिळतोय. येणार्‍या नव्या दिवसात ते अजून चॅन कार्यक्रम आपल्या समोर घेऊन येतील आणि कलाकारांना वेगवेगळ्या माध्यमातून सुवर्ण संधी देतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी उर्जा सोल्युशनचे मालक सुरज सामंत यांनीदेखील स्पर्धकांना मार्गदर्शन केले. रोहित गायकवाड आणि श्रद्धा गायकवाड या दोघांना आणि सगळ्या स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिल्या.