Sunday, July 5 2020 8:37 am

डीजी ठाणे अँप डाउनलोड करा आणि विभागाच्या विकासकामासाठी १० कोटी निधी मिळवा

ठाणे :(प्रतिनिधी)वारंवार प्रसिद्धी करूनही डीजी ठाणे अँप डाउनलोड करण्यामध्ये नागरिकांची उदासीनता दिसून आल्यामुळे पुन्हा एकदा एक नवी शक्कल ठाणे महापालिकेने लढवली आहे . डीजी ठाणेच्या माध्यमातून मालमत्ता कर भरल्यास काही प्रमाणात सवलत देण्याची घोषणा यापूर्वीच ठाणे महापालिकेने केली असून आता ज्या प्रभागामध्ये जास्तीतजास्त नागरिक डीजी ठाणे अँप नागरिक डाउनलोड करतील त्या प्रभागाच्या विकासकामांसाठी १० कोटींचा निधी देण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे . आतापर्यंत केवळ १० हजार नागरिकांनी हा अँप डाउनलोड केला असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारतातील पहिला महत्वाकांक्षी प्रकल्प ठरलेल्या डीजी ठाणे प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्याबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी त्याला जोडण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश महापालिका आक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. सोमवारी नागरी संशोधन केंद्र येथे डीजी ठाणे प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी संबंधित अधिका-यांना हे निर्देश दिले. देशातील पहिला आणि जगातील दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या या योजनेला मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही . हा अँप जास्तीत जास्त नागरिकांनी डाउनलोड करावा यासाठी पालिकेने अनेक पर्याय पुढे आणले असून यामध्ये आता ज्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त नागरिक हा अँप डाउनलोड करतील अशा प्रभागामध्ये १० कोटींचा निधी विकासकामांसाठी दिला जाणार असल्याची घोषणा पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.सदरचा प्रकल्प हा नागरिकांच्या दैनंदिन कामाकाजाशी निगडीत आहे. त्यांमुळे या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून हा प्रकल्प त्यांच्या दैनंदिन गरजांशी जोडण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत . त्याचबरोबर डीजी ठाणे ॲप डाऊनलोड केल्यानंतर महापालिकेच्यावतीने अंतर्गत आणि विविध व्यापा-यांकडून जे फायदे देण्यात येणार आहेत, ते फायदे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभाग समिती स्तरावरही माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शहरातील सर्व गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालयांशी समन्वय साधून या प्रकल्पाचे महत्व समजून सांगण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचे आदेश त्यांनी महापालिका अधिका-यांना दिले.