Friday, April 19 2019 11:48 pm

डीएमके प्रमुख करूणानिधी कालवश, चेन्नईतील कावेरी रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास

चेन्नई:मागील 11 दिवसांपासून रूग्णालयात दाखल द्रमुक पक्षाचे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94व्या वषी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मंगळवारी त्यांची तब्येत आणखी खालावली होती. यामुळे रूग्णालयाबाहेर हजारोंच्या संख्येने त्यांचे समर्थक जमा झाले होते. यूरिन इन्फेक्शन आणि लो ब्लड प्रेशरच्या तक्रारीनंतर 27 जुलैरोजी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.