Saturday, August 24 2019 11:56 pm

ठाण्यात १७ मे रोजी २४ तास पाणी कपात

ठाणे  :  ठाणे महानगरपालिका व स्टेम प्राधिकरण यांचे मार्फत ठाण्यात  शुक्रवार १७  मे २०१९  रोजी सकाळी ९.०० ते शनिवार दिनांक १८ मे २०१९  रोजी सकाळी ९.००  वाजेपर्यत पाणी कपात कार्यात येणार आहे. सादर कपात हि उद्या दि.१५ मे रोजी करण्यात येणार होती परंतु ती रद्द करून १७ मे रोजी २४ तास करण्यात येणार आहे. .या दिवशी स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा.लि. यांची मीरा भाइशदरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी व ठाणे महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी साकेत येथील रुस्तमजी टॉवरच्यासमोर स्लुस व्हॉल्व्ह व प्लेटद्वारे एकत्र करण्यात आलेली आहे. परंतु, सदर स्लुसव्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होत असल्यामुळे दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे.

या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करुन ठेवावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.