Monday, January 27 2020 10:24 pm

ठाण्यात हिंदू – मुस्लिम रक्षाबंधन दिन उत्साहात साजरा

ठाणे :- बहीण – भावाचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन ! या सणाचे औचित्य साधून समाजात एकोपा टिकावा यासाठी ठाण्यात हिंदू – मुस्लिम रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मुस्लिम महिलांनी हिंदू भावना राखी  बांधली तर बंधुरायांनी प्रत्येक बहिणीचे प्रत्येक महिलेचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगत शप्पथ घेतली. यावेळी दोन्ही समाजातील जेष्ठ नागरिक,राजकीय मंडळी, पोलीस,वकील, व्यवसाय, उद्योजक विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

ठाण्यातील शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू मुस्लिम या दोन समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपावी यासाठी रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचे या कार्यक्रमाचे 12वे वर्ष असून दरवर्षी मुस्लिम तसेच हिंदू महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमात भाग घेतात. ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचा आनंद घेतला यावेळी महिला बघिनींनी कुंभारे यांना राखी बांधली तर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची असून आम्ही कसुरभी मागे हटणार नाही असे वाचन अनिल कुंभारे यांनी महिलांना दिले.