Saturday, August 24 2019 11:30 pm

ठाण्यात शेतकरी महामोर्चा घोषणाबाजीसह पार…

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीन आज ठाण्यात  शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकरी महामोर्चा पार पडला.  १७ मे रोजी ठाणे महापालिकेवर निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे गुरुवारी केले होते.

हा मोर्चा ठाणे महापालिकेवर निघणार होता परंतु परवानगी न मिळाल्याने तो मोर्चा ठाणे जिल्हाअधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
या मोर्चेत शेतकर्याने डोक्यावर भाजीची टोपली घेऊन घोषणा बाजी केली. तसेच मोर्चेत शेतकरी बैलगाडी घेऊन सहभागी झालेचे दिसून आले. 
हा मोर्चा  केवळ ठाणे नव्हेच राज्यातील सर्व शहरांमध्ये शेतकºयांसाठी केवळ जागाच नव्हे, तर इतरही सुविधा मिळवून देण्यासाठी मनसे प्रशासनाला भाग पडण्यासाठी होता.
ठामपाने भाजपाच्या तक्रारीवरून आंब्याचा स्टॉल हटवण्याच्या मुद्द्यावरून राज यांनी शेतकरी महामोर्चेची घोषणा केली होती त्यानुसार आज शेतकरी महामोर्चा पार पडला. या वेळी शहरात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.