Monday, April 21 2025 10:50 am
latest

ठाण्यात मानपाडा येथे डॉक्टरची आत्महत्या

ठाणेः येथील हॅप्पी व्हॅली सोसायटी, मानपाडा येथे राहणारे डॉ. पावन लक्ष्मण साबळे हे सेठ गोर्धनदास वैद्यकीय महाविद्यालय, परळ मुंबई येथे जन औषध वैद्यकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत होते. ते ठाण्याच्या चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. शनिवारी सकाळी त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. डॉ. पवन साबळे यांनी आत्महत्यापूर्वी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. यानंतर 16 जानेवारी रोजी सेठ गोर्धनदास सुंदरदास यांनी डॉ. पवन साबळे यांना लेखी पत्र देऊन 16 फेब्रुवारी रोजी कार्यालयीन वेळेनंतर राजीनामा ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे कळविले होते. त्यानंतर डॉ. साबळे यांनी आत्महत्या केली. डॉक्टरच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. चितळसर
विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत होते. ते ठाण्याच्या चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते.. शनिवारी सकाळी त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. डॉ. पवन साबळे यांनी आत्महत्यापूर्वी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. यानंतर 16 जानेवारी रोजी सेठ गोर्धनदास सुंदरदास यांनी डॉ. पवन साबळे यांना लेखी पत्र देऊन 16 फेब्रुवारी रोजी कार्यालयीन वेळेनंतर राजीनामा ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे कळविले होते. त्यानंतर डॉ. साबळे यांनी आत्महत्या केली. डॉक्टरच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक निधनाची नोंद केलेली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.