Tuesday, July 23 2019 2:34 am

ठाण्यात महात्मा गांधी जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ठाणे :राष्ट्रपिता महत्तम गांधी यांच्या जयंती निमित्त ठाण्यात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भिवंडीत स्वच्छता पदयात्रा, शिक्षणापासून वंचित मुलांसाठी “चॅरीटी कप” फुटबॉलचे सामन्यांचे अजॉयजां करण्यात आले होते. तर हेलपिंग हॅन्ड्स योऊथ ऑर्गनाझेशन द्वारे परिसर स्वच्छ करण्याची मोहीम तरुणांनी राबविली. रेल्वे प्रशासनाने ट्रेन रंगवून एक पाऊल स्वच्छतेकडे टाकले.

भिवंडीत भाजपच्या वतीने स्वच्छता पदयात्रा काढून स्वच्छतेचा संदेश दिला. तर शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रोटरेक्ट क्लब ऑफ ठाणे ईस्ट यांच्या वतीने ठाण्यात “चॅरिटी कप” फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. दुसरीकडे हेलपिंग हॅन्ड्स योऊथ ऑर्गनाझेशनच्या विद्यमाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत सकाळी ७-३० ते ११ या काळात ज्ञानसाधना कॉलेज, मेंटल हॉस्पिटल्स आणि आरटीओ कार्यालयाचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम राबवली. यात शेकडो तरुण तरुणींनी सहभाग दर्शविला. केंद्र सरकारचे देशव्यापी स्वच्छता अभियान आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन रेल्वे प्रशासनाने चक्क ट्रेन रंगवुन एक पाऊल स्वच्छतेकडे टाकले आहे. चित्रकार व बालकलाकारांनी आपल्या कुंचल्याचे आविष्कार दाखवत ट्रेनवर महात्मा गांधींचे चित्र रेखाटून रेल्वेतुन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाश्यांना स्वच्छतेचे धडे देण्याचा अभिनव प्रयोग केला आहे.दरम्यान,ट्रेन रंगवुन स्वच्छतेचा दिंडोरा पिटणाऱ्या रेल्वे प्रशासनाने दररोज तुंबळ गर्दीत जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठीही उपक्रम राबवावेत अशा भावना प्रवाश्यांनी व्यक्त केल्या आहेत.