Thursday, November 21 2019 4:33 am

ठाण्यात मनसेने ठाणेकरांना वाटला “सीड बॉम्ब”

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहरात बॉम्ब फोडणार असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपासून चालू होती. बॉम्ब वाटपाचे बँनर ही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. तर ठाणे मनसेने याचे भांडवल आणि गाजावाजा केल्याने मनसेचा बॉम्ब नेमका कुठला? याबाबत लोकांनाही उत्सुकता बाळगली होती. ठाणेकर आणि प्रसारमाध्यमे कामाला लागली. तर मनसे बॉम्ब वाटप करणार असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्तही लावण्यात आला होता. अखेर संध्याकाळी मनसेचा बॉम्ब फुटला. अन उत्सुकता संपली.

मनसेच्या बॉम्बची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच शुक्रवारी मनसेच्या नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ठाणेकरांना “सीड बॉम्ब” चे वाटप करण्यात आले. राज्यातील आणि देशातील दुष्काळाची परिस्थिती पाहता आता पावसाळ्याच्या दिवसात “सीड बॉम्ब” झाड लावण्यासाठी असलेले बी चे वाटप मनसे नेते अभिजित पानसे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

त्यावेळी मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, संदीप पाचंगे, पुष्कर विचारे, नैनेश शिरकर, अनिल म्हात्रे, मनोहर चव्हाण, रोहीनी निंबाळकर यांच्या सह महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या.