Tuesday, July 14 2020 11:17 am
ताजी बातमी

ठाण्यात प्रथमच होणार राष्ट्रीय नृत्यस्पर्धा पाच लाखांचे भरघोस बक्षिसे

ठाणे : ठाण्यात प्रथमच एव्हीए  एंटरटेनमेंट या संस्थेमार्फत आयबीडीसी म्हणजे इंडियाज बिगेस्ट डान्स कॉम्पीटिशन 2020 या  राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या नृत्य स्पर्धेत देशभरातील सर्वप्रकारच्या नृत्य प्रकारच्या प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत. शेवटची ऑडिशन ही 19 जानेवारीरोजी दुपारी दोन ते पाच वा. या वेळेत गडकरी रंगायतन, ठाणे येथे  होणार आहे.  या स्पर्धेत लहान मुलं, मुली, युवा डान्सरसोबत वयोवृद्ध महिला, गृहिणी यांचा सहभाग हा स्पर्धेचे आकर्षणअसेल.
या अंतिम स्पर्धेमध्ये मराठी दिग्दर्शक संजय जाधव आणि  अप्सरा आलीया नृत्य स्पर्धेतील उपविजेती ऋतुजा राणे तसेच अन्य  परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.  या स्पर्धेची उपांत्य फेरी 1 फेब्रुवारी  होणार असून 2 फेब्रुवारी रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, ठाणे येथे ग्रँड फिनाले  पार पडेल. या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धेनिमित्ताने  खास महिला आणि मुलींसाठी फॅशन आयकॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये वयोवृद्धमहिलांचा खास सहभाग असणारआहे.
तरी यास्पर्धेत सहभाग घ्यावे असे आवाहन आयोजक विजया अमोल शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी  स्पर्धकांनी  9930662006/  7900006864 याक्रमांकावर संपर्क साधावा, ही विनंती