Wednesday, November 6 2024 4:10 pm

ठाण्यात दृष्टिहीनांचे काव्यसंमेलन

ठाणे, 02 : दृष्टिहीनांना वाचनाचा आनंद मिळवून देणाऱ्या लुईस ब्रेल यांच्या स्मरणार्थ कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेने ठाण्यात दृष्टिहीनांच्या काव्यसंमेलनाचा अभिनव कार्यक्रम आयोजित केला आहे. एकूण सहा अंध कवी यावेळी आपल्या कविता सादर करतील.

शनिवार, 6 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी सहा वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे, (प.) येथे हा कार्यक्रम आयोजित केला असून प्रसिद्ध उद्योजक संतोष डावखर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.

तरी ठाणेवासियांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शहर शाखेचे अध्यक्ष ॲड. मनोज वैद्य यांनी केले आहे.