Sunday, August 25 2019 12:12 am

ठाण्यात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खडड्यात गाडी पलटी

ठाणे :- ठाण्यातील मुल्ला बाग डेपो जवळ  इगल कंस्ट्रक्शन द्वारे नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खडड्यात गाडी पलटी दुर्घटना घडली. आज सकाळी ०६:१५ च्या सुमारास हा अपघात घडला असून  श्री सचिन काकोडकर हे मारूती सुझुकी अर्टीका गाडी घेवून निलकंठ ग्रीन्स कडून घोडबंदर रोडकडे जात असताना त्यांची गाडी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खडड्यात गाडी पलटी झाली.
सदर घटनास्थळी पोलिस अधिकारी, आ व्य कक्ष कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी इ. , १ इर्मजन्सी टेंडर, १ रेस्कयू वाहन व १ हायड्रा सह उपस्थित होते.  घटनास्थळी हायड्रा च्या सहाय्याने अर्टीका कारला खड्यातून  बाहेर काढण्यात आले व कार मध्ये अडकलेले श्री. सचिन काकोडकर  यांना बेथनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. डॉ. रमेश मिश्रा व डॉ. अभिजीत पाटील यांनी सकाळी ०७:१५ च्या सूमारास त्यांना मृत घोषित केले आहे. श्री सचिन काकोडकर हे रूम नं ५०२, चित्रा बिल्डिंग आकाशगंगा कॉम्लेक्स,  घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे राहत होते.