Friday, May 24 2019 9:16 am

ठाण्यात खाडी किनारी चार संशयितांकडून घातपात करण्याच्या शक्यता: पोलीस बंदोबस्त तैनात

ठाणे – ठाण्यात काल  गुरुवारी रात्री  कोलशेत येथील खाडी जवळ चार संशयित व्यक्ती आढळल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोलशेत मधील  एका स्थानिक रहिवाश्यांनी काळ रात्री ४ अज्ञात व्यक्तींना संशयास्पद हालचाली करताना पहिले. इथूनच घातक स्फोटकांसाठी वापरले जाणारे अमोनिया नायट्रेट एका बाटलीत द्रव्य स्वरूपात आढळले. .
 चौघांचीही शरीरयष्टी धिप्पाड होती. त्यांच्या पाठीवर बॅगहि होत्या अशी माहिती त्या रहिवाश्याने कोलशेत भागातच असलेल्या एअर फोर्स स्टेशन च्या  अधिकाऱ्यांना हि घटना सांगितली. एअर फोर्सने पोलिसांसह नौदलाला हि माहिती लगेच दिली. त्यानंतर संशयित व्यक्तीची शोध मोहीम सुरु करण्यात आली. पोलिसांसह नौदलानेही खाडी परिसरात शोध मोहीम सुरु केली आहे. खाडीच्या त्या बाजूला  भिवंडी परिसराचा भाग सुरु होतो आणि एकीकडे वर्सोवा परिसर आहे. या भागातही पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. संपूर्ण खाडी परिसरात पोलीस, जलद कृती दल, एअर फोर्स आणि नौदलाने बंदोबस्त लावला आहे.
हे संशयी व्यक्ती कोण होते व ती अमोनिया नायट्रेट पावडर तिथे कोणी टाकली याचा शोध लवकरात लवकर घेतला जाईल असे  पोलीस उपयुक्त अविनाश अम्बुरे यांनी सांगितले. घातपात घडवून आणण्याच्या संशयानं अमोनियाची पावडर आणण्यात आली होती का, या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे. ठाणे आणि भिवंडीच्या खाडी किनारी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.