Sunday, September 15 2019 3:14 pm

ठाण्यात एसटी स्टँडवरील होडींग्ज कोसळले ; कोणतीही जीवितहानी नाही

ठाणे :ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एसटी स्टँडवर असलेला होडींग्ज पडल्याची घटना घडली. गुरुवार दुपारी हा होडींग्ज पडला असुन सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुन्हा एकदा अनाधिकृत होडींग्ज चा मुद्दा समोर येत आहे.  या आधी देखील होडींग्ज पडुन नागरिकांचा जीवहि गेल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. त्यात महापालिकेने याला परवानगी दिली नसताना देखील एसटी विभागामार्फत ती  परवानगी  देण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.  काल बुधवारी मुंबई मध्ये होर्डींग्ज पडून एकाचा मृत्यु झाला असतानाच आज गुरुवारी ठाण्यात होर्डींग्ज पडल्याची घटना समोर आली आहे. ठाणे स्टेशन परिसरातील एसटी डेपो जवळील डेपोच्या भिंतीवर उभारण्यात आलेले होर्डींग्ज वाऱ्यामुळे खाली पडले. ते पडत असतांना मध्ये वायर आल्याने होर्डींग्ज त्यामध्ये काही काळ अडकले होते. त्यानुसार एसटी विभागामार्फत याची तत्काळ दखल घेत, येथील वाहतुक त्यांनी बंद केली. त्यानंतर ते होर्डींग्ज खाली काढण्यात आल्याची माहिती एसटी विभागामार्फत देण्यात आली. एसटी स्टेशन हे अतिशय वर्दळीचे ठिकाण मानले जाते. परंतु सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. असे असले तरी या होर्डींग्जला ठाणे महापालिकेने परवानगी दिली नव्हती. त्याची परवानगी ही एसटी महामंडळाने दिली असल्याचे पालिकेने स्पष्ट केले