Monday, June 17 2019 4:42 am

ठाण्यातून महायुतीतर्फे उमेदवार राजन विचारे यांचा अर्ज दाखल.

ठाणे :- ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार श्री. राजन बाबुराव विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेना मध्यवर्ती शाखा, न्यू इंग्लिश स्कूल येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. पुढे राम मारुती रोड –  गोखले रोड – गावदेवी – अशोक टॉकीज – मराठी ग्रंथ संग्रहालय –   तहसीलदार कार्यालय – गणपती मंदिर / जांभळी नाका –डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकीत महायुतीचे नेते पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते सामील झाले होते.

युतीचे उमेदवार राजन विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी शिवसेना ज्या प्रमाणात अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करेल अशी अपेक्षा असताना राजन विचारे यांच्या रॅलीमध्ये फार कमी कार्यकर्ते सहभागी झाले होते ,त्यामुळे आनंद परांजपे यांनी काढलेल्या रॅलीच्या तुलनेत विचारे यांच्या रॅलीमध्ये त्याप्रमाणात शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले नाही . नौपाडा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेपासून विचारे यांच्या रॅलीला सुरुवात करण्यात आली . त्यानंतर  नौपाडा मार्गे ठाणे बाजारपेठेतून  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हि रॅली काढण्यात आली . पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार नरेंद्र मेहता ,आमदार संजय केळकर , सभागृह नेते नरेश म्हस्के, तसेच सेना आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते .  ठाणे लोकसभा मतदार संघासाठी अर्ज भरण्यासाठी विद्यमान खासदार राजन विचारे यांचा दुपारी दीडचा मुहूर्त होता . १०.३० ते ११ च्या सुमारास विचारे यांच्या रॅलीसाठी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते नौपाडा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या ठिकाणी जमा झाले होते . ढोल ताशा आणि बँड पथकाच्या गजरात या रॅलीला सुरुवात करण्यात आली . शिवसेना मध्यवर्ती शाखा,राम मारुती रोड,गोखले रोड,गावंदेवी देवी, अशोक टॉकीज, तहसीलदार कार्यालय , जांभळी नाका,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला . जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . आतापर्यंत शिवसेना अर्ज दाखल करताना शिवसेनेचे ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन पहायला मिळते त्या तुलनेत विचारे यांच्या रॅलीमध्ये मात्र फार कमी कार्यकर्ते सहभागी झाले होते . विशेष म्हणजे भाजपचे तसेच सेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती देखील म्हणावी तशी लाभली नव्हती . या रॅलीमध्ये शिवसेनेनेचे झेंडे मोठ्या प्रमाणात पहायला मिळाले मात्र भाजपचे फार कमी झेंडे पहायला मिळाले .      

गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस , पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे . सहा विधासभा मतदार संघात युतीचे खासदार आणि आमदार आहे . त्यामुळे जनता पुन्हा एकदा मला निवडणून देतील हा मला पूर्ण विश्वास आहे . युतीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे . तरुणांसाठी रोजगार कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल तसे प्रयन्त देखील केले जातील . ठाणे शहर हे स्मार्ट सिटी कडे वाटचाल करत आहे . त्यामुळे तीनही शहरांचा सामान विकास केला जाईल अशी प्रतिक्रिया विचारे यांनी यावेळी दिली .