Sunday, September 15 2019 11:15 am

ठाण्यातील लुईलवाडी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट; दोन जखमी

ठाणे : भारत गॅस कंपनीच्या सिलेंडर लिकेज असल्यामुळे  गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना ठाण्यातील  लुईलवाडी येथे घडली. या घटनेत घरातील दोघे जण जखमी झाले असून  त्यांना जवळील क्रिटीकेअर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पीयूष शर्मा (४ वर्षे) आणि अनिता शर्मा (३० वर्षे) असे जखमींची नावे आहेत तर  अनिता शर्मा हि गंभीर जखमी आहे. आज सकाळी १० वाजल्याच्या सुमारास हि घटना घडली.  भारत गॅस कंपनीच्या सिलेंडर लिकेज होऊन आगीचा भडका उडाला. यामुळे  गॅस जवळ असलेल्या  सौ. अनिता शर्मा या 70 – 80 टक्के भाजलेली असल्याने त्यांना पुढील उपचारा करिता ऐरोली येथील नॅशनल बर्न  या रूग्णालयात घेऊन जात आहेत.

घटनास्थळावरील तळ अधिक एक मजली चाळीचा धोकादायक झालेला भाग प्रादेशिक आपत्ती व्यवस्थान कक्षा कडून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काढण्यात आलेला आहे. सदर घटनास्थळी प्रा.आ.व्य.कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन केंद्राचे फायरमन तसेच टी.डी.आर.एफ. चे डेप्युटी कमांडट उपस्थित होते.